Thursday, April 16, 2026

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली; सर गंगा राम रुग्णालयात दाखल

Date:

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची प्रकृती खालवली असून त्यांना नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. सध्या सर्व काही सामान्य असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रकृती स्थिर आहे – सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांची मुलगी प्रियांका गांधी वाड्रा आणि मुलगा राहुल गांधी हे देखील रुग्णालयात उपस्थित आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तपशीलवार अधिकृत वैद्यकीय बुलेटिन अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यांचाया प्रकृतीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे. परंतु प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्रार्थना करत आहेत. रुअद्याप ग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच हेल्थ बुलेटिन जाहीर होण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यात झाला होता असाच त्रास : सोनिया गांधी यांना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात सोनिया गांधी यांना असाच त्रास झाला होता, त्यानंतर त्यांना सर गंगा राम रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांना छातीरोग तज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यावेळी सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार होती असी माहिती दिली होती. छातीत संसर्ग आणि ब्रॉन्किअल अस्थमामुळे त्यांना सहा दिवस रुग्णालयात राहावे लागले होते.

अनेकवेळा रुग्णालयात : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गेल्या काही वर्षांत प्रकृतीच्या कारणास्तव अनेक वेळा वैद्यकीय देखरेखेखाली राहावे लागले आहे. काही महिन्यांपूर्वी, पोटाच्या त्रासामुळे त्यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ञांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले होते.

राजस्थानमधून राज्यसभेच्या सदस्य : डिसेंबर 2025 मध्ये वयाच्या 79 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या सोनिया गांधी सध्या राजस्थानमधून राज्यसभेच्या सदस्य आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक राहिल्या आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक वेळा लोकसभेच्या खासदार आणि पक्षाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

शेअर करा

आणखी वाचा