Saturday, June 6, 2026

रत्नागिरीतील परकार हॉस्पिटल अग्नितांडव: माजी आमदार बाळासाहेब माने यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी, रुग्णांची विचारपूस

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी: रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरातील प्रसिद्ध ‘परकार हॉस्पिटल’ला सोमवारी अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील ‘एसी’ला लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले होते. मात्र, प्रशासनाची तत्परता आणि अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या अपघात स्थळी जाऊन रत्नागिरीचे माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळासाहेब माने यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. 

आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच धावपळ आणि घबराट उडाली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तब्बल ५७ रुग्णांना तातडीने इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या आगीत रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

बाळासाहेब माने यांच्याकडून पाहणी: या दुर्घटनेची माहिती मिळताच यश फाउंडेशनचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी तातडीने परकार हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तसेच रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अलीमिया परकार यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. बाळासाहेब माने यांनी केवळ हॉस्पिटल प्रशासनालाच धीर दिला नाही, तर इतरत्र हलवण्यात आलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

शेअर करा

आणखी वाचा