Thursday, April 16, 2026

“बालजगत” मध्ये ऐका आमचो ह्यो कोकण, आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर १२ रोजी होणार प्रसारित

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : कोकणातल पर्यटन अनेकांना आवडतं. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत हेच सांगणारा कार्यक्रम आमचो ह्यो कोकण आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या बालजगतमध्ये 12 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता प्रसारित होणार आहे. 

जिल्हा परिषद आदर्श शाळा पोमेंडी खुर्दच्या विद्यार्थ्यानी सादर केलेला आमचो ह्यो कोकण हा कार्यक्रम रत्नागिरीतल्या विविध पर्यटन स्थळांवर आधारित आहे. हा कार्यक्रम ऐकताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडणार आहे. भूगोलाच्या नकाशावरच्या कोकणात अनेकविध गोष्टी दडलेल्या आहेत. मात्र कोकणात राहणाऱ्या अनेक लोकांना त्यांची माहिती नसते. मुलांना पडणाऱ्या सुट्टीत कोकण दर्शन घडवणारा हा कार्यक्रम म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

११४३ किह.या मध्यमलहरी वाहिनीवर 101. 5 मे. ह.या एफ. एम. वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे असून सर्व लहान मुलांनी हा कार्यक्रम अवश्य ऐकावा असा आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

आणखी वाचा