Friday, July 3, 2026

रत्नागिरीत लवेकर मोटर्सच्या नव्या अशोक लेलँड LCV शोरूमचे दिमाखात उद्घाटन

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : येथील जे.के. फाईल्स समोर, महानगर गॅस शेजारी अशोक लेलँडच्या लाईट कमर्शियल व्हेईकल (LCV) विभागाच्या ‘लवेकर मोटर्स’ या नव्या भव्य शोरूमचे उद्घाटन गुरुवारी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसेच अशोक लेलँड वाहनांचा वापर करणारे जुने वाहनधारकही यावेळी उपस्थित होते त्यांनी अशोक लेलँड सर्विस सेंटर कडून मिळणाऱ्या, त्यांच्या टीम कडून मिळणाऱ्या उत्कृष्ट सेवेबाबत आपल्या मनोगतामध्ये कौतुक केले आणि यापुढेही अशीच उत्कृष्ट सेवा अशोक लेलँडच्या वाहन खरेदीदारांना मिळेल अशी आशा व्यक्त केली

मान्यवरांच्या हस्ते झाले उद्घाटन : शोरूमचे उद्घाटन अशोक लेलँडचे बिझनेस हेड श्री. विप्लव शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला ऑटोमोबाईल आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी अशोक लेलँडच्या समाधानी ग्राहकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

उपस्थित प्रमुख पाहुणे : या दिमाखदार सोहळ्याला  मान्यवरांनी उपस्थिती लावून लवेकर मोटर्सला शुभेच्छा दिल्या: त्यामध्ये झोनल मॅनेजर अतुलजी क्षीरसागर, रिजनल मॅनेजर गौरव ठाकरे, एरिया सेल्स मॅनेजर अभिषेक नाडकर्णी, सुनील पाटील, अखिलेश चोपडे. शासकीय व बँकिंग क्षेत्रातील अधिकारी: आरटीओ अधिकारी, बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर सुधाकर गोन्नाडे, प्रदीप गायकवाड, विविध फायनान्स व इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी. स्थानिक उद्योजक शेखर लवेकर, प्रकाश मयेकर, सचिन शिंदे, दैवज्ञ पतपेढीचे विजय पेडणेकर, संतोष भुर्के, प्रमोद खेडेकर, करसल्लागार उज्ज्वल बापट, वरुण फडके आदी मान्यवरांचा समावेश होता.

ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा अतिशय यशस्वी ठरला. रत्नागिरीतील वाहतूक आणि उद्योग क्षेत्राला गती देणाऱ्या या नव्या शोरूमला उपस्थितांनी भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

१५ ग्राहकांना मिळाल्या नव्या वाहनांच्या चाव्या!

“उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिल्याच दिवशी १५ ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या नव्या अशोक लेलँड वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.”

लवेकर परिवारातर्फे जंगी स्वागत : कार्यक्रमाच्या प्रारंभी लवेकर मोटर्सचे संचालक संदीप लवेकर, श्रेयस लवेकर, कुणाल लवेकर, रश्मी लवेकर, राजेश्वरी पातकर आणि अनुरूप पातकर यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे व ग्राहकांचे मनापासून स्वागत केले.

ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा अतिशय यशस्वी ठरला. रत्नागिरीतील वाहतूक आणि उद्योग क्षेत्राला गती देणाऱ्या या नव्या शोरूमला उपस्थितांनी भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

आणखी वाचा