Friday, July 3, 2026

आरोग्य केंद्रे ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर,  कुपोषित बालकांसाठी विशेष मोहीम राबविणार : पालकमंत्री उदय सामंत 

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा परिषद येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या. या प्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंदे, उपाध्यक्ष विलास चाळके व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर असून, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या ६५२ कुपोषित बालके आढळून आली असून, त्यापैकी ३८ मुले तीव्र कुपोषित स्वरूपाची आहेत. त्यातील ५ बालके ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. म्हणजेच ३३ आपल्या जिल्ह्यातील आहेत. आणि 652 जी कुपोषित यादीत आलेले बालके आहेत ती तीव्र कुपोषित बालकांच्या यादीमध्ये जाऊ नये यासाठी आपल्याला दक्षता घ्यावयाची आहे. त्यामुळेच संबंधितांच्या घेतलेल्या बैठकीत असे ठरविण्यात आले की जी 38 कुपोषित बालके आहेत त्यांना दोन महिन्यात तीव्र कुपोषित मधून बाहेर काढण्यासाठी आम्ही एक यंत्रणा तयार करीत आहोत. याकरिता मी हॉस्पिटल सारखेच एक यंत्रणा रत्नागिरीत उभी करतो आहोत. त्यासाठी तीव्र कुपोषित बालक आणि त्यांच्या पालकांना एकाच ठिकाणी आणून ठेवून आठ दिवसांची ट्रीटमेंट करून त्यातून ती मुले बाहेर पडतात का याचा आपण प्रयत्न करणार आहोत. डेरवण सारखे हॉस्पिटल सोबत घेऊन वेरूळ मध्ये जे प्रोटीन चे लाडू दिले जातात ते देऊन ही मुले कुपोषणातून बाहेर येतील का यासाठीचा प्रयत्न आहे. तसेच जिल्हा नियोजन मधून काही निधी घेऊ न औषधे किंवा पोषण आहार देऊन ती स्टेज बदलता येते का याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत. 

652 कुपोषित बालकांबाबत जो आम्ही निर्णय घेतला आहे त्यानुसार आपले जे 56 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्यांच्या जिल्हा परिषदेच्या पूर्ण गटामध्ये जिथे जिथे कुपोषित बालके आहेत इथे त्याचे पालकत्व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी स्वीकारावे असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्या पद्धतीने प्रशासन काम करेल आणि जो आकडा आपल्याला सध्या वाढल्याचे दिसते आहे तो आकडा वर्षभराच्या आत 50 टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न आहे. अजून सहा सात महिन्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुपोषित बालकांच्या बाबतीत महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच कुपोषित बालकांचे प्रमाण जिल्ह्यात अन्य राज्यातील जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासन आणि जिल्हा प्रशासन चांगलं काम करते आहे. त्यामुळे बालकांचे कुपोषण कमी करण्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद हे अग्रेसर राहील असा विश्वास यावेळी मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

 पटसंख्येअभावी अनेक शाळा बंद पडत आहेत. या बंद पडत असलेल्या शाळांच्या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून २० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण : 

पायाभूत सुविधांचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी रत्नागिरी विमानतळाच्या कामाची माहिती दिली. विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील आठवड्यात विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात संबंधित विमान कंपनीशी सामंजस्य करार केला जाईल, ज्यामुळे लवकरच रत्नागिरीतून अधिकृत विमानसेवा सुरू होईल.

राणेंच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही : अणुऊर्जा प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर विरोध करणाऱ्यांना राणे स्टाईलने उत्तर दिले जाईल फटकवण्यात येईल असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले होते याबाबत विचारले असता मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की, राणे हे आमचे नेते असल्याने त्यांच्या वक्तव्यावर आपण कोणतीही टीका किंवा भाष्य करणार नाही.

शेअर करा

आणखी वाचा