मुंबई: प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, या आठवड्यात सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली असून सोने आणि चांदीच्या किमती कमालीच्या घसरल्या आहेत. चांदीच्या भावात तब्बल १५,००० रुपयांची, तर सोन्याच्या भावात ५,००० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहकांसाठी ही खरेदीची एक उत्तम संधी मानली जात आहे.
सोन्याच्या दरात घसरण; काय आहे आजचा भाव?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज २८ जून २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३९,८७३ रुपये (अंदाजे १.४० लाख रुपये) झाला आहे.
गेल्या आठवड्यात २० जून रोजी सोन्याचा भाव १.४५ लाख रुपये होता. म्हणजेच अवघ्या काही दिवसांत सोन्याच्या दरात ५,०९७ रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
चांदी तब्बल १५ हजारांनी स्वस्त
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव २.३२ लाख रुपये प्रति किलोवरून थेट २.१७ लाख रुपये प्रति किलोवर आला आहे. म्हणजेच चांदीच्या दरात एकाच आठवड्यात १५,४३२ रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.
या वर्षातील सर्वात मोठा चढ-उतार (फ्लॅशबॅक २०२६):
या वर्षात सोने आणि चांदीने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, मात्र त्यानंतर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली:
सोन्याचा प्रवास: ३१ डिसेंबर २०२५ रोजी सोन्याचा भाव १.३३ लाख रुपये होता. त्यानंतर २९ जानेवारी रोजी सोन्याने १.७६ लाख रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. मात्र, जानेवारीतील त्या उच्चांकापासून आतापर्यंत सोनं तब्बल ३६,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
चांदीचा प्रवास: ३१ डिसेंबर २०२५ रोजी चांदी २.३० लाख रुपये प्रतिकिलो होती. २९ जानेवारी रोजी चांदीने ३.८६ लाख रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव गाठला होता. त्या सर्वोच्च दरापासून गेल्या १४९ दिवसांत चांदी तब्बल १.६९ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, रविवारी (28 जून) 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,39,873 रुपये झाला झाला आहे.
IBJA नुसार, आजचा सोन्याचा दर खालीलप्रमाणे (Gold Rate Today in Marathi)
कॅरेटनुसार सोने आजचा सोन्याचा दर
सोने 24 कॅरेट 139873 प्रति 10 ग्रॅम
सोने 22 कॅरेट 139313 प्रति 10 ग्रॅम
सोने 20 कॅरेट 128124 प्रति 10 ग्रॅम
सोने 18 कॅरेट 104905 प्रति 10 ग्रॅम
सोने 14 कॅरेट 81826 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (24 Carat Gold Rate Today)
शहराचे नाव आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई 139873
पुणे 139873
नागपूर 139873
कोल्हापूर 139873
जळगाव 139873
सांगली 139873
बारामती 139873
