रत्नागिरी प्रतिनिधी : पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य ‘कीर्तनरंग महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, दिनांक ३ जून ते शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा महोत्सव संपन्न होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ (रत्नागिरी) आणि वात्सल्य-स्नेह (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, जयेश मंगल पार्क व खल्वायन (रत्नागिरी) यांचे या कार्यक्रमाला विशेष सौजन्य लाभले आहे.
मुख्य आकर्षण: ‘कीर्तनचंद्रिका’ सौ. रोहिणी माने-परांजपे
या तीन दिवसीय महोत्सवात पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार, ‘कीर्तनचंद्रिका’ आणि ‘कीर्तन शिरोमणी’ सौ. रोहिणी माने-परांजपे आपल्या अमोघ वाणीतून कीर्तनरूपी सेवा सादर करणार आहेत. त्यांना संगीताची उत्कृष्ट साथ लाभणार असून ऑर्गनवर श्री. कौस्तुभ परांजपे (पुणे) आणि तबल्यावर श्री. अमेय हर्डीकर (पुणे) हे संगत करणार आहेत.
कार्यक्रमाचा सविस्तर तपशील:
दिनांक: ३, ४ आणि ५ जून २०२६ (बुधवार ते शुक्रवार)
वेळ: दररोज सायंकाळी ६.०० ते रात्री ९.०० वाजता
स्थळ: जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी.
आवाहन: : कीर्तन ही आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा आहे. तरी रत्नागिरीतील सर्व कीर्तनप्रेमी, रसिक नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
