लांजा प्रतिनिधी : येथील कोत्रेवाडी स्थित ‘झिमण्स कश्यु पॉईंट’ ही काजू फॅक्टरी फोडून काजू गर चोरीला गेल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसतानाही, रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अत्यंत चाणाक्षपणे गोपनीय माहितीच्या आधारे या चोरीचा छडा लावला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) शाहरुख मुराद साखरकर (वय ३० वर्षे, रा. भाटये नवानगर, ता. जि. रत्नागिरी) २) वजीद मोहम्मद अझीझ खान (वय ४१ वर्षे, रा. बांद्रा पश्चिम, मुंबई; सध्या रा. भाटये, जामा मशिदी शेजारी, रत्नागिरी)
असा उघडकीस आला गुन्हा: दिनांक २८ मे २०२६ रोजी संध्याकाळी ६.०० वाजल्यापासून ते २९ मे २०२६ रोजी सकाळी ९.२० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी फॅक्टरीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि काजू गर चोरून नेला होता. चोरीची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. गुप्तहेरांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.
लाखांचा मुद्देमाल व वाहन जप्त: : अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेला संपूर्ण काजू गर आणि गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी गाडी, असा एकूण ९,४१,८७९ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लांजा पोलीस ठाण्यामार्फत केला जात आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
ही धडक कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील खालील अधिकारी व अंमलदारांनी या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली:
सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप ओगले
स.पो.फौ. (११८८) सुभाष भागणे
पो.हवा. (९०९) विजय आंबेकर
पो.हवा. (१०६७) अमित कदम
पो.हवा. (१४०७) दीपराज पाटील
चालक पोलीस शिपाई (२१५) अतुल कांबळे
