Thursday, September 3, 2026

रुपाली चाकणकर फरार…रुपाली पाटील ठोंबरे यांच्या फेसबुक पोस्टने मोठी खळबळ

Date:

मुंबई प्रतिनिधी : नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्या व्हिडिओने समाजमन हादरले आहे. कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. बुवाबाजीच्या आडून त्याने महिलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ पण समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. आता याप्रकरणावरून रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे. त्यांची फेसबूक पोस्ट राज्यात एकच चर्चेचा विषय ठरली आहे. भोंदू खरातचे अश्लील कारनामे समोर आल्यानंतर याप्रकरणात अनेक पुढाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा रंगली आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत : अजितदादा पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यात यापूर्वी सुद्धा अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. तर भोंदू अशोक खरात याच्या व्हिडिओवरून आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकरांवर मोठा हल्ला चढवला आहे. चाकणकरांचे या भोंदूसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर खासदार संजय राऊतांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आता रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ‘राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार … बजाव टाली’ असे लिहिले आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

अशोक खरात प्रकरणी SIT चौकशीला वेग : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी SIT चौकशीला वेग आला आहे. डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओमधील पीडितांना न्याय देण्यावर भर देण्यात येत आहे. आर्थिक व्यवहार, खरातच नेटवर्क, सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार असल्याचे समजते. याप्रकरणी राज्यात संतापाची लाट असून वाढता दबाव पाहता याप्रकरणी तपासाची चक्र फिरल्याचे दिसते.

शेअर करा

आणखी वाचा