Monday, April 20, 2026

चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ  डाॅ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांचे निधन

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी – स्वतिक हॉस्पिटल व चिरायु हॉस्पिटलच्या संस्थापिका रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ञ डाॅ. सौ. सुनिता रमेश चव्हाण यांना आज पहाटे दीर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे राहते घरी स्वस्तिक बंगला, माळनाका येथे दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात चिरंजीव डाॅ. नितिन चव्हाण ,कन्या डाॅ. सौ. पल्लवी यादव , व डॉ.सौ वैभवी इंदुलकर ( पूर्वाश्रमीच्या डॉ. विशाखा चव्हाण) असा परिवार आहे. 

त्यांची अंत्ययात्रा स्वस्तिक बंगला माळनाका ते चर्मालय स्मशानभूमी अशी सायंकाळी ४ वाजता राहत्या घरातून निघणार आहे. त्यांचा निधनामुळे सर्व स्तरातून तीव्र दुःख व्यक्त होत आहे. 

शेअर करा

आणखी वाचा