Thursday, April 16, 2026

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये “नवराष्ट्र सन्मान २०२६” साठी संदेश जिमन यांची निवड जाहीर, शनिवारी सन्मान सोहळा

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : दैनिक नवराष्ट्र आयोजित “रत्नागिरी-सिंधुदुर्ग नवराष्ट्र सन्मान सोहळा २०२६” अंतर्गत सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संदेश सुरेश जिमन यांची “आदर्श युवा समाजसेवक” म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान सोहळा शनिवार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी चिपळूण येथील हॉटेल अतिथी (सभागृह) येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

संदेश जिमन यांनी सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेस, जामनगर एक्सप्रेस, पोरबंदर एक्सप्रेस आणि नागपूर–मडगाव एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचे थांबे मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा आणि ग्रामीण भागातील विविध विकासकामांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

💬 प्रतिक्रिया 

“हा सन्मान माझा नसून समाजासाठी केलेल्या कार्याची दखल आहे. पुढेही जनहितासाठी अधिक जोमाने काम करत राहीन.” – संदेश जिमन 

शेअर करा

आणखी वाचा