Saturday, June 6, 2026

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; १० तोळे सोने आणि रोकड हडपली; दापोलीत पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Date:

दापोली प्रतिनिधी – सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना दापोलीतील जोगळे-नशेमन कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? : चिपळूण येथील रहिवासी नजीफा मंजूर दळवी (२७) यांचा विवाह ९ नोव्हेंबर २०२४ रोजी दापोलीतील मंजूर शकील दळवी यांच्याशी झाला होता. मात्र, संसाराची गोडी फार काळ टिकली नाही. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच हुंड्यासाठी नजीफा यांचा छळ सुरू झाला.

छळाचा कालावधी: ९ नोव्हेंबर २०२४ ते ८ ऑक्टोबर २०२५

आरोपांचे स्वरूप: वारंवार क्रूर वागणूक, शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ.

धमकी: “या छळाबाबत कोणाला सांगितल्यास किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास जीवे ठार मारू,” अशी धमकीही सासरच्या मंडळींनी दिली.

ऐवजाचा अपहार : तक्रारीनुसार, लग्नात नजीफा यांना मिळालेले १० तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम आरोपींनी स्वतःच्या ताब्यात ठेवून तिचा अपहार केला. हक्काचे स्त्रीधन परत न देता विवाहितेची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दापोली पोलिसांनी या प्रकरणी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:

मंजूर शकील दळवी (पती)

ममताज शकील दळवी

शकील दिलावर दळवी

मेहनाज वाहिद महाडीक

कमरजहॉन शादाब मुजावर

(सर्व राहणार: नशेमन कॉलनी, भारत नगर, जोगळे, ता. दापोली)

दापोली पोलिसांनी ३० मार्च रोजी दुपारी ४ वाजता भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे:

कलमे: ८५, ३१६ (२), ३१८ (४), १११ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३(५).

या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करत असून, या घटनेमुळे परिसरात हुंडाबळीच्या प्रवृत्तीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

आणखी वाचा