Saturday, June 6, 2026

खेड भाजपच्या जनता दरबारात ११० जणांनी मांडली गाऱ्हाणी; प्रलंबित प्रश्न सुटणार!

Date:

खेड (प्रतिनिधी): सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासकीय आणि वैयक्तिक प्रश्न थेट शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबाराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या दरबारात तब्बल ११० नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात मांडल्या.

प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे आणि भाजप नेते ॲड.. वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. आलेल्या ११० अर्जांपैकी ८५ समस्या या शासकीय व प्रशासकीय विभागांशी संबंधित होत्या, तर १५ तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या होत्या. महसूल, आरोग्य, रस्ते आणि स्थानिक प्रशासनाशी निगडित अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न यावेळी समोर आले.

तातडीने तड लावण्याचे आश्वासन : यावेळी बोलताना अॅड. वैभव खेडेकर म्हणाले की, “नागरिकांना आपल्या कामांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये, हा या जनता दरबाराचा मुख्य उद्देश आहे. लोकांच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचवून त्या तातडीने सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढेही अशा प्रकारचे दरबार भरवून जनतेला न्याय दिला जाईल.”

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये त्यामध्ये नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, गटनेते रहिम सहीबोले, शहराध्यक्ष नंदू साळवी, संजय आखाडे, कार्यकर्ते: ॲड. मिलींद नांदगावकर, ऋषीकेश मोरे, नईम चौगुले, सर्वेश पवार, प्रणव म्हापुसकर, अक्षय सनगरे, विजय गुप्ता, स्वराज गांधी, प्रदिप भोसले, या उपक्रमामुळे खेडमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासकीय कामांना आता गती मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

शेअर करा

आणखी वाचा