Thursday, September 3, 2026

रत्नागिरीच्या ‘रत्नदुर्ग’ किल्ल्यावर १० मे रोजी भव्य स्वच्छता व संवर्धन मोहीम

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास सांगणाऱ्या गडकिल्ल्यांचे जतन करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य आहे. याच भावनेतून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान (रत्नागिरी विभाग) आणि राजा शिवछत्रपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग येथे भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

मोहिमेचा तपशील: रत्नदुर्गाच्या महादरवाजा परिसर आणि हनुमान मंदिर क्षेत्रात ही मोहीम राबवली जाणार आहे. पावसाळा जवळ येत असल्याने किल्ल्यावरील वाढलेले गवत काढणे, प्लास्टिक कचरा हटवणे आणि परिसराची स्वच्छता करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

स्थळ: महादरवाजा (हनुमान मंदिर), किल्ले रत्नदुर्ग, रत्नागिरी.

दिनांक: १० मे २०२६ (रविवार)

वेळ: सकाळी ठीक ७:०० वाजता.

मावळ्यांना आवाहन: या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व मावळ्यांनी आणि शिवप्रेमींनी संवर्धनासाठी आवश्यक असलेली हत्यारे (उदा. विळा, कुदळ, घमेले, झाडू इ.) स्वतःसोबत घेऊन येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. “आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन” या ध्येयाने प्रेरित होऊन जास्तीत जास्त युवकांनी या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : मोहिमेच्या नियोजनासाठी किंवा सहभागासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल:

📞 ९९२०९०५९२०

📞 ७६६६७०८२०१

📞 ८५९१५६८३७१

शेअर करा

आणखी वाचा