Saturday, June 6, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वे ब्रिजजवळ टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; ४ प्रवासी जखमी

Date:

नरेंद्राचार्यजी संस्थानच्या रुग्णवाहिकेची तत्परता; मोठी जीवितहानी टळली!

खेड (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात सत्राची मालिका सुरूच असून, आज ८ मे २०२६ रोजी सकाळी ११:५० च्या सुमारास खवटी रेल्वे ब्रिज येथे एका टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात दहिसर येथील चार प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.

नेमकी घटना काय? : मुंबईहून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे निघालेली टेम्पो ट्रॅव्हल्स (क्रमांक MH 47 BY 1067) खवटी रेल्वे ब्रिज परिसरात आली असता, अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

जखमींची नावे (सर्व रा. दहिसर, मुंबई):

१. अनु विनायक कोलमकर (वय ३८)

२. त्रिशा अनिल सिंग (वय ८)

३. गुंजन अनिल सिंग (वय ११)

४. अनिल श्रीशंकर सिंग (वय ३८)

देवदूतासारखी धावून आली रुग्णवाहिका

घटनेची माहिती मिळताच भरणे नाका येथे २४ तास सेवेत सज्ज असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान (नाणीज धाम) यांची विनामूल्य रुग्णवाहिका अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी अत्यंत तत्परता दाखवत सर्व जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे हलवले. सद्यस्थिती: जखमींवर कळंबणी रुग्णालयात उपचार सुरू असून, सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चालकांनी वाहने जपून चालवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

आणखी वाचा