Thursday, September 3, 2026

श्री साईअनिरुद्ध एज्युकेशन संस्थेच्या ‘डी.जे. सामंत इंग्लिश मिडियम स्कूल’ पाली आणि लांजाचा दहावीचा निकाल १०० टक्के!

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या श्री साईअनिरुद्ध एज्युकेशन संस्थेच्या डी.जे. सामंत इंग्लिश मिडियम स्कूल (पाली आणि लांजा) या दोन्ही शाळांनी दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. दोन्ही विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

लांजा विद्यालयाचे चमकते तारे : डी.जे. सामंत इंग्लिश मिडियम स्कूल, लांजा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे:

प्रथम क्रमांक: कु. बासुरी सुधीर पांचाळ (९५.६०%)

द्वितीय क्रमांक: कु. श्रेया संदिप निवळे (८४.४०%)

तृतीय क्रमांक: जुवेरिया आदम रखांगी (८०.८०%)

पाली विद्यालयाची यशस्वी घोडदौड : पाली हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनीही आपल्या कष्टाच्या जोरावर उज्वल यश संपादन केले आहे:

प्रथम क्रमांक: अल्फिया जावेद खान (८३.६०%)

द्वितीय क्रमांक: कु. राकेश अर्जुन परमार (८२.२०%)

तृतीय क्रमांक: कु. आयुष उमेश कळंबटे (८१.००%)

कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव : या यशाबद्दल श्री साईअनिरुद्ध एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र उर्फ अण्णा सामंत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

लांजा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चारुदत्त उपाध्ये आणि पाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. संस्थेचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

“विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच आम्ही १०० टक्के निकालाचे उद्दिष्ट गाठू शकलो. या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

— संस्था प्रशासन

शेअर करा

आणखी वाचा