Saturday, June 6, 2026

HDFC बँकेला धक्क्यांवर धक्के! चेअरमनच्या राजीनाम्यानंतर आता 3 अधिकाऱ्यांची हकालपट्टी, बाजारात तीव्र प्रतिक्रिया 

Date:

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच बँकेचे माजी अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांनी गेल्या दोन वर्षांत बँकेत घडलेल्या काही ‘घटना आणि प्रथा’ त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी आणि नैतिकतेशी सुसंगत नव्हत्या, असे म्हणत अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. चक्रवर्ती यांच्या अस्पष्ट पण गंभीर विधानाने बाजारात तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि शेअरमध्ये मोठी विक्री सुरू झाली.

यातच बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या माजी अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांच्या सूचनेनुसार आता बँकेने आपले रिटेल ब्रँच बँकिंगचे ग्रुप हेड, संपत कुमार यांना, कामावरून बडतर्फ केल्याचे वृत्त समोर आले आहे. या अधिकाऱ्यांवर चुकीच्या पद्धतीने क्रेडिट सुईसचे उच्च-जोखमीचे एटी-1 बॉण्ड्स विकल्याचा आरोप आहे, ज्यामुळे बँकेची प्रतिष्ठा आणि शेअर्सवर नकारात्मक परिणाम झाला.
HDFC बँकेतून तीन अधिकाऱ्यांची हकालपट्टी :
एचडीएफसी बँकेने नुकतेच बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये ग्रुप हेड ऑफ ब्रांच बँकिंग, संपत कुमार आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट (मिडल ईस्ट, आफ्रिका आणि एनआरआय ऑनशोर बिझनेस) पायल मंधायन यांचा समावेश असून कथित गैर-विक्री प्रकरणाच्या चौकशीदरम्यान बँकेने ही कारवाई केल्याचे मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले.
बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीएनबीसी-टीव्ही18 या व्यावसायिक वृत्तवाहिनीला सांगितले की, गुप्ता आणि मंध्यान चुकीच्या विक्रीमध्ये सक्रियपणे सहभागी होते, तर ही घटना कुमार यांच्या देखरेखीखाली घडल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
काही वर्षांपूर्वी क्रेडिट सुईस बँक कोसळली आणि यूबीएसमध्ये विलीन झाली. बँकेचे एटी1 बॉण्ड्स निर्लेखित करण्यात आले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले. तसेच अनेक श्रीमंत अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सोसावे लागले आणि त्यांना लिव्हरेज्ड पोझिशन्सवर मार्जिन कॉलचा सामना करावा लागला.
आदल्या दिवशी, शुक्रवारी, शेअर मार्केट बंद झाल्यावर एचडीएफसी बँकेशी संबंधीत ही नवीन घडामोड समोर आली. अशा स्थितीत, आता सोमवार पुन्हा एकदा या बँकेच्या स्टॉककडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.

 

शेअर करा

आणखी वाचा