Thursday, April 16, 2026

मालदीवच्या अथांग समुद्रात सिंघानियांची बोट उलटली! रशियन महिलेसह 4 भारतीय बेपत्ता;  सिंघानिया बचावले

Date:

मालदीव : मालदीवमध्ये घडलेल्या स्पीडबोट अपघाताने मोठी खळबळ उडाली असून रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम विजयपत सिंघानिया यांना या दुर्घटनेत किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून सध्या ते मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या अपघातात काही पर्यटक बेपत्ता झाल्याने शोधमोहीम सुरू आहे.

पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट मालदीवमधील ‘व्ही फेलिधू’ परिसरात उलटली. या दुर्घटनेत गौतम सिंघानिया यांच्यासह सात जण प्रवास करत होते. अपघातात काही जण समुद्रात वाहून गेले, तर काहींची सुटका करण्यात आली.
ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे घडली. घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आणि जखमींना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. मालदीवमधील ‘व्ही फेलिधू’ या पर्यटनस्थळाजवळ ही घटना घडली. हा परिसर पर्यटकांसाठी लोकप्रिय मानला जातो.
या स्पीडबोटमध्ये एकूण सात जण होते, ज्यामध्ये यूके आणि रशियातील दोन महिला तसेच भारतातील पाच पुरुषांचा समावेश होता. त्यामध्ये उद्योगपती गौतम सिंघानिया यांचाही समावेश होता. अपघातात रशियातील एक महिला आणि भारतातील चार पुरुष बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. रॅली चालक हरी सिंग यांचाही शोध सुरू आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट : अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड किंवा मानवी चूक यांपैकी कोणत्याही कारणामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत तपास सुरू असून कारण लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
शेअर करा

आणखी वाचा