Friday, September 4, 2026

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल; ‘असा’ पाहा तुमचा रिझल्ट

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी :गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची वाट पाहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

नुकताच २ मे रोजी बारावीचा निकाल लागल्यानंतर, आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. अखेर उद्या ही प्रतीक्षा संपणार आहे.

महत्वाची माहिती आणि वेळापत्रक:

निकाल जाहीर होण्याची वेळ: ८ मे, दुपारी १:०० वाजता.

कुठे पाहाल निकाल: मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाइटवर) विषयनिहाय गुण पाहता येतील.

प्रत (Print): विद्यार्थ्यांना निकालाची ऑनलाईन प्रत डाऊनलोड करून घेता येईल.

गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन (Re-evaluation):

ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल किंवा त्यांना गुणांची पडताळणी करायची असेल, त्यांच्यासाठी मंडळाने खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत:

अर्ज करण्याची मुदत: ९ मे ते २३ मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल.

छायाप्रत अनिवार्य: पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत (Photocopy) मिळवणे आवश्यक आहे.

वेळ: छायाप्रत मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत विहित शुल्कासह पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल.

नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी : पुणे, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या सर्व विभागांचा निकाल उद्या एकाच वेळी पोर्टलवर उपलब्ध होईल. शाळांनाही त्यांचा एकत्रित निकाल मंडळाच्या लॉगिनवरून पाहता येणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा!

शेअर करा

आणखी वाचा