Saturday, June 6, 2026

तुरंबव प्रीमियर लीगमधून युवकांचा एकोपा आणि क्रीडाभावनेचे दर्शन !

Date:

चिपळूण  (विश्वनाथ पंडित) :  तुरंबव येथील युवकांनी “तुरंबव प्रीमियर लीग (TPL)” या क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. गावामध्ये एकोपा, बंधुभाव वाढवणे, ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीस चालना देणे, तेथील युवकांना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. 

स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी शारदा टूस्टचे अध्यक्ष दशरथ पंडित, समाज सेवक सुनिलशेठ जाधव, बाळशेठ जाधव, शैलेश पंडित, दीपक घागरम, राजाराम पंडित, गौरव पवार यांच्यासह ग्रामस्थ, बाल क्रिडापटू मोठ्या ‌संख्येने यावेळी उपस्थित उपस्थित होते. खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ, एकजूट आणि बंधुप्रेमाचे दर्शन घडवत स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. या उपक्रमाला युवकांसह ग्रामस्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. युवकांमधील ऐक्य, बंधुभाव आणि एकजूट कायम टिकून राहावी, हा या क्रिकेट लीगचा मुख्य उद्देश असून भविष्यातही ही लीग नियमितपणे आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

यावेळी “मोठ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन गावातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत राहील,” असे मतही आयोजक समितीने व्यक्त केले.

शेअर करा

आणखी वाचा