Saturday, June 6, 2026

रत्नागिरी जिल्ह्याचा मानबिंदू! ‘दळवटणे’ ठरले १००% स्वगणना पूर्ण करणारे पहिले गाव

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : भारताच्या जनगणना २०२७ या महामोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहे. चिपळूण तालुक्यातील मौजे दळवटणे गावाने निर्धारित वेळेत आपली ‘स्वगणना’ (Self-Enumeration) प्रक्रिया १००% पूर्ण करून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्हा प्रशासनाकडून दळवटणे ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

विक्रमी वेळेत उद्दिष्ट साध्य

जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीसाठी १ ते १५ मे २०२६ हा कालावधी ‘स्वगणना’ करण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्त्वाखाली आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते १ मे रोजी जिल्ह्यात या मोहिमेचा प्रारंभ झाला होता. दळवटणे गावाने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, मुदतीपूर्वीच गावातील सर्व ४२५ कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली.

लोकसंख्येचा नवा टप्पा

२०११ च्या जनगणनेनुसार दळवटणे गावाची लोकसंख्या १८७१ होती. मात्र, या ताज्या स्वगणनेतून गावच्या विस्ताराचे चित्र स्पष्ट झाले असून, आता गावची अंदाजे लोकसंख्या २२६२ वर पोहोचली आहे.

वाड्यांनिहाय सविस्तर माहिती:

गावातील सर्व ९ वाड्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला:

नलावडेवाडी: १०१ कुटुंबे

बागवाडी: ६७ कुटुंबे

भुवडवाडी: ६४ कुटुंबे

गणेशवाडी: ५१ कुटुंबे

बौद्धवाडी: ४९ कुटुंबे

बडदेवाडी: ३५ कुटुंबे

राजवाडा: २२ कुटुंबे

शेट्येवाडी व रामवाडी: प्रत्येकी १८ कुटुंबे

“प्रशासकीय मार्गदर्शन आणि स्थानिक पथकाची जिद्द यामुळेच दळवटणे गावाने हे यश संपादन केले आहे. आगामी जनगणनेसाठी हे गाव संपूर्ण जिल्ह्यासाठी पथदर्शक ठरेल.”

— प्रशासकीय सुत्रांकडून व्यक्त झालेली भावना

यशाचे शिल्पकार ::उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. प्रत्यक्ष क्षेत्रीय कामात प्रगणक वैशाली पेड्डेवाड, सचिन जाधव, प्रिया मोरे यांच्यासह शीतल कराडकर, रोशनी जाधव, ऋतुजा इंगवले आणि पोलीस पाटील अमित मोहिते यांच्या पथकाने परिश्रम घेतले. या यशाबद्दल संपूर्ण चिपळूण तालुक्यासह  जिल्हाभरातून दळवटणे ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

आणखी वाचा