Thursday, September 3, 2026

लांजा ओझर येथे भररस्त्यात मारहाण आणि शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

Date:

लांजा प्रतिनिधी : येथील ओझर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर आपापसांत भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दोन तरुणांवर लांजा पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून दुपारी तीनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नितेश चंद्रकांत आर्डे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस गस्तीवर असताना त्यांना लांजा ओझर येथील सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम आपापसांत तीव्र वादावादी करताना दिसून आले. सिद्धांत सिकंदर कांबळे (वय ३४, रा. बौद्धवाडी, लांजा) आणि अमित बबन जाधव (वय ३१, रा. न्हावी वाडी, लांजा) हे दोघे सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना हाताच्या थापटाने मारहाण करत होते. तसेच ते मोठ्या आवाजात अश्लील शिवीगाळ व दमदाटी करून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची शांतता भंग करत होते.

पोलिसांच्या समक्ष हा प्रकार घडल्याने, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम १९४(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शेअर करा

आणखी वाचा