रत्नागिरीत येत्या रविवारी (१७ मे) न्यूरॉलॉजी व मणक्यांच्या आजारांवर मोफत वैद्यकीय शिबिर
रत्नागिरी प्रतिनिधी : सततची डोकेदुखी आणि दृष्टी कमी होणे ही मेंदूतील गाठीची (ब्रेन ट्यूमर) लक्षणे असू शकतात. अशा गंभीर आजारांवर मात करण्यासाठी ठाणे येथील सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक ‘न्यूरो नेव्हिगेशन’ तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हॉस्पिटलने आतापर्यंत १०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना नवीन जीवनदान दिले आहे. विशेष म्हणजे, कोकणातील रुग्णांसाठी या रविवारी रत्नागिरीत एका भव्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
काय आहे न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञान? : हॉस्पिटलचे संचालक आणि प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले की, “न्यूरो नेव्हिगेशन हे मेंदूसाठी एखाद्या ‘जीपीएस’सारखे काम करते. शस्त्रक्रिया करताना ट्यूमरचे नेमके स्थान शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान डॉक्टरांना अचूक मार्गदर्शन करते. यामुळे कवटी न उघडता, नाकावाटे (मिनिमली इन्व्हेसिव्ह) शस्त्रक्रिया करणे शक्य होते. यात मेंदूला इजा होण्याचा धोका कमी असतो आणि रुग्ण अत्यंत वेगाने बरा होतो.” केवळ मेंदूच नव्हे, तर मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्येही हे तंत्रज्ञान वरदान ठरत आहे. यामुळे मणक्यात स्क्रू बसवताना होणारी चूक किंवा इतर गुंतागुंत टाळता येते.
रत्नागिरीत मोफत वैद्यकीय शिबिर
रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने आणि अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक: रविवार, १७ मे २०२६
वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ३.००
ठिकाण: आर. बी. शिर्के हायस्कूल, सन्मित्र नगर, रत्नागिरी.
कोणी लाभ घ्यावा?: दीर्घकालीन डोकेदुखी, चक्कर येणे, फिट्स, पाठदुखी, मानदुखी, मेंदू व मणक्यांच्या गाठी, न्यूरोपॅथी किंवा हालचालीत संतुलन नसणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
लक्षणे ओळखा, वेळेत उपचार करा : प्रख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. दीपक ऐवळे यांच्या मते, “भारतात दरवर्षी पिट्यूटरी अॅडेनोमाचे १० लाखांहून अधिक रुग्ण आढळतात. महिलांमधील हार्मोनल बदल आणि दृष्टीवर होणारा परिणाम ही ट्यूमरची लक्षणे असू शकतात. सोलारिस हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली सर्व तज्ज्ञ उपलब्ध असल्याने या शस्त्रक्रिया अधिक सुलभ झाल्या आहेत.”
गेल्या तीन वर्षांत सोलारिस हॉस्पिटलने महाराष्ट्रातील नाशिक, नांदेड, सोलापूर आणि रत्नागिरीसह विविध भागांतील रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे.
नोंदणीसाठी संपर्क : शिबिरासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून, इच्छुकांनी श्री. विवेक महाकाळ (८६५५६९६४९६) किंवा श्री. पुरुषोत्तम पवार (८४३३५२९४३५) यांच्याशी संपर्क साधावा.
