संगमेश्वर प्रतिनिधी : तालुक्यातील नावडी येथील एका अभियंता तरुणाची अज्ञात सायबर भामट्याने ऑनलाईन पद्धतीने २ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
फिर्यादी शशांक प्रकाश सावंत (वय ३५, रा. नावडी, संगमेश्वर) यांच्या बँक ऑफ इंडिया, शाखा संगमेश्वर या खात्यामधून ९५,०००/- आणि ८०,०००/- रुपये तसेच जनता सहकारी बँक लि. पुणे, शाखा संगमेश्वर या खात्यामधून ५०,०००/- रुपये अशी एकूण २,२५,०००/- रुपयांची रक्कम अज्ञात इसमाने ऑनलाईन काढून घेतली. ही घटना ३० मे ते १ जून २०२६ दरम्यान घडली असून, १२ जून रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
