Friday, July 3, 2026

धक्का की गेमचेंजर? रत्नागिरीत ठाकरे सेनेला खिंडार; सहदेव बेटकर हातावर बांधणार ‘कमळ’!

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : कोकणच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रत्नागिरीत प्रचंड मोठा झटका बसला आहे. ठाकरे सेनेचे तगडे नेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

का महत्त्वाचा आहे हा पक्षप्रवेश? : कुणबी समाजाचा मोठा चेहरा: सहदेव बेटकर हे केवळ नेते नसून रत्नागिरीतील कुणबी आणि ओबीसी समाजाचा एक मोठा आणि प्रभावी चेहरा मानले जातात.

भाजपची ताकद वाढणार: आगामी बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा हाय-व्होल्टेज प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बेटकर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अखेर त्यांनी राजीनामा देऊन या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं आहे. बेटकरांच्या या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पडलं असून, भाजप बॅकफूटवरून थेट फ्रंटफूटवर आली आहे.

शेअर करा

आणखी वाचा