Friday, September 4, 2026

टर्की टूरच्या नावाखाली मेक माय टुरॅक्स कंपनीकडून रत्नागिरीचा नगरसेविकेसह दोघींना १२ लाख ४० हजारांचा चुना

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : परदेशात पर्यटनासाठी जाण्याचे स्वप्न दाखवून रत्नागिरीतील दोन मैत्रिणींची १२ लाख ४० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एका टुरिस्ट कंपनीच्या चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत सौ. समृद्धी सुदेश मयेकर (वय ४५, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी संदीप कुमार (वय ५१, रा. रोहिणी सेक्टर-११, उत्तर-पश्चिम दिल्ली) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे घेऊनही टूरला नेले नाही : ही घटना २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत थिबा पॅलेस परिसरात घडली. फिर्यादी समृद्धी मयेकर आणि त्यांच्या मैत्रिणी रत्नागिरीचा नगरसेविका सौ. वैभवी विजय खेडेकर यांना टर्कीमधील इस्तंबूल येथे पर्यटनासाठी जायचे होते. यासाठी त्यांनी ‘Make My Tourx’ नावाच्या टूर कंपनीचे चालक संदीप कुमार यांच्याशी संपर्क साधला.

परदेशात टूरसाठी नेले नाही : आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, मयेकर यांनी टूर पॅकेजसाठी ५,००,००० रुपये आणि वैभवी खेडेकर यांनी त्यांच्या कुटुंबासाठी ७,४०,००० रुपये अशी एकूण १२,४०,०००/- रुपयांची रक्कम कंपनीच्या विविध बँक खात्यांमध्ये भरली. मात्र, आजतागायत आरोपीने त्यांना परदेशात टूरसाठी नेले नाही आणि घेतलेली रक्कमही परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी ३ जुलै रोजी सायंकाळी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शेअर करा

आणखी वाचा